Status in Marathi

2277 Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook

New Alone Angry Attitude Birthday Breakup Brothers Cheat Crush Emotional Festivals Friends Funny Good Morning Gym Happiness Heart Touching Independence Day International Friendship Day Life Love Mahakal Miss U Motivational Rain Sad Selfish Single Sisters Sorry Thanks
 

लक्षावधी वर्षानी एखादा सुर्य निर्माण होतो, कित्येक कळप शोधल्यावर कस्तुरी मृग सापडतो, हजारो शिँपले उघडल्यावर एखादा मोती दिसतो, शेकडो माणसे आयुष्यात भेटतात पण त्यात, तुझ्या सारखा मिञ एखादाच असतो.

मैत्रीमध्ये जरुरी नाही दररोजची भेट, ह्रदयाचा ह्रदयाशी संवाद असता थेट. तुझी-माझी मैत्री म्हणजे आयुष्याचा ठेवा, मुखवट्यांच्या गर्दीमधला खात्रीचा विसावा..

एखाद़याशी सहजचं हसता हसता, रुसता आल पाहीजे. त्याच्या डोळ्यातल पाणी अलगद, पुसताही आल पाहीजे. मान अपमान मैत्रीत असं काहीच नसतय. आपल्याला तर फक्त त्याच्या ह्रदयात, राहता आल पाहिजे.

मिञ-मैञिणी हे असेच असतात, पाखरासारखे कुठून तरी उडत उडत येतात, मनामध्ये हळव्या प्रेमाचं घरटं बनवतात, सुख:-दु:खाची गाणी गुणगुणतात, आणि एके दिवसी मैञीच्या धाग्याचं एक अविस्मरणीय घरटं, मनामध्ये आठवण म्हणून ठेवून जातात.

मैञी असावी प्रकाशासारखी मनाचा आसमंत उजवल करणारी, मैञी असावी एक मार्ग स्वप्ऩांना सत्यात उतवणारी, sमैञी असावी विश्वासाची हिशेबाची उठाठेव न करणारी, मैञी असावी सुखाची साथीदार अन दुःखाची भागीदार.

मैत्री एक गांव असत आणी मैत्रिण हे त्याहून सुन्दर नाव असत हे नाव असत आनंदाच नाव असत दिलेल्या धीराच, मदतीच्या हाताच आयुष्यातल्या आनंदघनाच मैत्रिण हे नाव असत वरवर साध वाटल तरी काळजाचा ठाव असत.

हसतच कुणीतरी भेटत असतं, नकळत आपल्यापेक्षाही आपलसं वाटत असतं, केंव्हा कोण जाणे मनात घर करुन राहत असतं, ते जोपर्यंतजवळ आहे त्याला फूलासारखं जपायचं असतं, दूर गेल्यावरही आठवण म्हणून मनात साठवायचं असतं, याचचं तर नाव “मैत्री”असं असत.

मैत्री म्हणजे शब्दांशिवाय एकमेकांच मन जाणून घेण, चुकलं तर ओरडण, कौतुकाची थाप देण, एकमेकांचा आधार बनण, मैत्री म्हणजे अतूट विश्वास. मैत्री म्हणजे आयुष्याचा प्रवास सुसह्य करणारी हिरवीगार पाऊलवाट.

मैत्री,नको फुलासारखी,शंभर सुगंध देणारी. नको सूर्यासारखी ,सतत तापलेली. sनको चंद्रासारखी,दिवसा साथ न देणारी. नको सावली सारखी, कायम पाठलाग करणारी. मैत्री हवी अश्रुसारखी, सुख दुखात समान साथ देणारी.

मैत्री असावी चंदनासारखी, सुगंध देणाऱ्‍या फुलासारखी, जशी तुटलेल्या ताऱ्याला आधार देणाऱ्या धरतीसारखी, प्रकाशाचे तेज घेऊन सावलीसारखी कोमल असावी.

असे हृदय तयार करा की, त्याला कधी तडा जाणार नाही, असे हास्य तयार करा की, ह्रदयाला त्रास होणार नाही, असा स्पर्श करा की, त्याने जखम होणार नाही, अशी मैत्री करा की, त्याचा शेवट कधी होणार नाही.

बंधना पलीकडे एक नाते असावे, शब्दांचे बंधन त्याला नसावे, एक प्रेमळ भावनांचा आधार असावा, दु:खाला तिथे थारा नसावा, असा गोडवा एक आपल्या मैत्रीत असावा.