2277 Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
मैत्रीच्या सहवासात अवघं आयुष्य सफ़ल होतं देवाच्या चरणी पडून जसं फ़ुलांचही निर्माल्य होतं.
मैत्रीच्या नात्याने ओंजळ माझी भरलेली तुझ्या साथीने आयुष्याची वाट नव्याने फुललेली रात्र होती काळोखी दुःखामध्ये बुडलेली तुझी सावली होती संगे प्रकाश बनुनी खुललेली..
काही नाती बनत नसतात. ति आपोआप गुंफली जातात… मनाच्या ईवल्याशा कोपऱ्यात काहि जण हक्काने राज्य करतात. त्यालाच तर “मैत्री” म्हणतात.
तेज असावे सूर्यासारखे, प्रखरता असावी चंद्रासारखी, शीतलता असावी चांदण्यासारखी, आणि मैत्री असावी तुझ्यासारखी.
मैत्री म्हणजे पान नसते सुकायला, मैत्री म्हणजे फुल नसते कोमेजायला, sमैत्री म्हणजे फळ नसते पिकायला, मैत्री म्हणजे फांदी नसते तुटायला, मैत्री म्हणजे मुळ असते एकमेकांना आधार द्यायला..
मैत्री म्हणजे मायेची साठवण, मनाने मनाला दिलेली प्रेमाची आठवण हा धागा नीट जपायचा असतो, तो कधी विसरायचा नसतो कारण ही नाती तुटत नाहीत, ती आपोआप मिटून जातात जशी बोटांवर रंग ठेवून फुलपाखरे हातून सुटून जातात..
रक्ताची नाती जन्माने मिळतात, मानलेली नाती मनाने जुळतात, पण नाती नसतानाही जी बंधनं जुळतात, त्या रेशमी बंधनांना मैत्री म्हणतात.
मैत्री नावाच्या नात्याची, वेगळीच असते जाणीव, भरून काढते आयुष्यात, प्रत्येक नात्यांची उणीव.
माझी मैत्री कळायला, तुला थोडा वेळ लागेल.. पण ती कळल्यावर, तुला माझं वेड लागेल.
खरच मैत्री असते पिंपळाच्या पाना सारखी त्यांची किती ही जाळी झाली तरी, ती मनाच्या पुस्तकात जपून ठेवावीशी वाटती.
रक्ताच्या नात्यात नसेल एवढी मैत्रीच्या नात्यात ओढ असते, कशी ही असली तरी शेवटी मैत्री गोड असते.
चांगले मित्र, हात आणि डोळे प्रमाणे असतात जेह्वा हाताना यातना होतात तेह्वा डोळे रडतात आणि जेह्वा डोळे रडतात तेह्वा हात अश्रू पुसतात.