2277 Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
अजूनही आठवतो मला, आपला तो पावसातला क्षण, एकाच छत्रीत जातांना, वेड्यासारखे पाहत होते आपल्याकडे कित्येक जन…
पावसाच्या थेंबासारखी, तु ही घसरशील, आणि, माझ्या सोबत भिजण्यासाठी, एकदातरी, छत्री मुद्दाम घरी विसरशील…
मी मुद्दामच छत्री आणत नाही, पाऊस येणार म्हणून, मला भिजतांना पाहिलं कि, तू छत्रीत घेणार म्हणून…
पाऊस पडत असतांना, तो मातीचा सुगंध, आणि गार गार वारा.. मला नेहमीच आवडतात झेलायला, मुसळधार पावसाच्या त्या बरसणाऱ्या धारा…
रात्री वारा सुटलेला, आणि पाऊस पडत होता, सहज वर पाहीले तर चक्क, चंद्र रडत होता…
ओल्या तुझ्या त्या स्पर्शाला, मंद-मंद असा सुवास आहे, आजही आठवतोय तोच पाऊस, अडकलेला ज्यामध्ये माझा श्वास आहे…
बरसणाऱ्या पावसामध्ये कोणी शोधतंय हरवलेले क्षण, कोणी पावसात अश्रु लपवून हलके करतोय मन…
प्रिय मैत्रिणींनो, पावसात जास्त भिजू नका.. कारण Science असं सांगतं की साखर पाण्यात विरघळते, आणि तुम्ही तर साखरेपेक्षा गोड आहात… Happy Monsoon!
आज पावसाला देखील, मस्त रंग चढलाय.. जणु तो ही कोणाच्या तरी, प्रेमात पडलाय…
सुटलाय थंड वारा, त्यात पावसाच्या धारा.. असं वाटतं, आज तुझ्या मिठीतच जाऊ दे, माझा वेळ सारा…
Feel My Love! एवढंच सांगायचं आहे तुला, Like First Raindrops, तसं.. तुझ्या प्रेमात भिजायचंय मला…
मला तुझी आठवण येतेय, हे ह्या पावसाला कसं कळतं गं, रोज तुझ्या आठवणी भिजवतात, आज बहुतेक हा पाऊस भिजवणार…