2277 Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
गुलाब उमलतो नाजुक काट्यावर. गवत झुलते वा-याच्या झोतावर. पक्षी उडतो पंखाच्या जोरावर. माणूस जगतो आशेच्या किरणावर . आणि मैत्री टिकते ती फक्त “विश्वासावर”
दिवा मातीचा आहे कि सोन्याचा आहे हे महत्वाचे नसून, तो अंधारात किती प्रकाश देतो हे महत्वाचे आहे, त्याच प्रमाणे मित्र श्रीमंत आहे कि गरीब आहे हे महत्वाचे नसून, तो तुमच्या संकटात किती खंबीर पणे तुमच्या पाठीशी उभा राहतो हे महत्वाचे आहे.
कोणी कितीही बोललं तरी, कोणाचं काही ऐकायचं नाही, कधीही पकडले गेलो तरी, मित्रांची नावं सांगायची नाही.
पाकळ्यांचं गळणं म्हणजे फुलांचं मरणं असतं. मरतांनाही सुगंध देणं यातच आयुष्याचं सार असतं, असं आयुष्य जगणं म्हणजे खरच सोनं असतं. पण या आयुष्यात तुमच्या सारखे मित्र मिळाले तर, हे जगणं सोन्याहून पिवळं असतं.
देव माझा सांगून गेला, पोटापुरतेच कमव.. जिवाभावाचे मित्र मात्र, खूप सारे जमव.
श्रीमंत मित्र सोबत वावरतांना, गरीब मित्र दुर्लक्षित झाला नाही पाहिजे आणि, गरीब मित्र सोबत वावरतांना, श्रीमंतीचा आवाज आला नाही पाहिजे हाच मैत्रीचा धर्म आहे.
आपले मित्र ना राजा ना वजीर पण, मॅटर झाल्यावर दोन मिनिटात हाजीर !
मैत्री असावी मना मनाची, sमैत्री असावी जन्मो जन्मांची, मैत्री असावी प्रेम आणि त्यागाची, अशी मैत्री असावी फक्त तुझी आणि माझी.
लक्षावधी वर्षांनी एखादा सुर्य निर्माण होतो, कित्येक कळप शोधल्यावर कस्तुरी मृग सापडतो, हजारो शिंपले उघडल्यावर एखादा मोती दिसतो, शेकडो माणसे आयुष्यात भेटतात, पण त्यात एखादाच मित्र तुझ्यासारखा असतो.
आयुष्यात असे लोक जोडा की, जे वेळ येईल तेव्हा तुमची सावली आणि वेळेला तुमचा आरसा बनतील, कारण आरसा कधी खोटे बोलत नाही आणि सावली कधी साथ सोडत नाही.
प्रेम असो वा मैत्री, जर हृदयापासून केली तर, त्याच्याशिवाय आपण एक मिनीट पण राहु शकत नाही.
लहानपणापासून मला दोनच गोष्टी जास्त मिळाल्या, एक म्हणजे बिस्कीट आणि दुसरी म्हणजे मित्र, फरक फक्त एवढाच आहे बिस्कीट मिळाले मारीचे, आणि मित्र मिळाले हाणामारीचे.