2277 Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
मैत्री म्हणजे काय ? कुठलाही गोष्टीची परवा न करता एकमेकांसाठी काही करून जाणारी प्रत्येक संकटात आपल्या माणसांची अनुभूती देणारी विश्वास आणि आपलेपणाची नाती जपणारी मैत्री म्हणजे जीवनतील एक अतूट नात वय, समाज आणि वर्ण याचे बंधन नसणारी.
नुसता रुबाबच नाही तर धमक पण आहे. आणि नुसता पैसा नाही तर, मनाची श्रीमंतीपण आहे. आणि म्हणुनच तुम्ही मित्र असल्याचा नुसता गर्वच नाही तर माजपण आहे.
“मैत्री” असा खेळ आहे दोघांनीही खेळायचा असतो. एक ‘बाद’ झाला तरी दुसर्याने ‘डाव” सांभाळायचा’असतो.
श्वासातला श्वास असते मैत्री ओठातला घास असते मैत्री काळजाला काळजाची आस असते मैत्री कोणीही जवळ नसताना साथ असते ती मैत्री.
जे जोडले जाते ते नाते, जी जडते ती सवय, जी थांबते ती ओढ, जे वाढते ते प्रेम, जो संपतो तो श्वास, पण निरंतर राहते ती मैत्री, आणि फक्त मैत्री.
विसरु नको तु मला, विसरणार नाही मी तुला, विसरतो का कधी कोण आपल्या मिञाला, मैञीन तर तुच आहेस माझी खास, कस विसरु शकतो मी तुला.
मैत्री म्हणजे संकटाशी झुंजणारा वारा असतो. विश्वासाने वाहणारा आपुलकीचा झरा असतो.
पावसातुन जेवढा ओलावा मिळत नाही तेवढा जिव्हाळा मैत्री मधुन मिळतो, मैत्री मधल्या सावलीचा अर्थ कधी तरी उन्हातुन आल्यावरच कळतो.
ओजळीत घेवुन समुद्र कधी दाखवता येत नाही, निळ्याभोर गगनाचा अंत कधी लागत नाही, हाताने काढलेल्या फुलांना सुगंध कधी येत नाही, खऱ्या मैत्री पूर्ण भावनांचा उल्लेख कधी ‘शब्दात’ करता येत नाही..
मैत्री म्हणजे अत्तराची ईवलीशी कुपी दु:खावरची हळुवार जादूची झप्पी मैत्री म्हणजे न दिसणारा हातामधला हात नेहमीकरता असणारी तुझीचं साथ.
मैत्री आणि प्रेमात फरक एवढाच की, प्रेमाने कधी हसवले नाही, आणि मैत्रीने कधी रडवले नाही.
तुझ्या आयुष्याच्या पुस्तकात माझ्या मैञीचे एकच पान असु दे, सुवर्णाक्षराने नको प्रेमाच्या शाईने लिहिलेले असु दे. त्या पानाची कडा थोडी दुमडून ठेव, आठवण माझी येईल तेव्हा सहजपणे तेच पान उघडून ठेव!