Status in Marathi

2277 Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook

New Alone Angry Attitude Birthday Breakup Brothers Cheat Crush Emotional Festivals Friends Funny Good Morning Gym Happiness Heart Touching Independence Day International Friendship Day Life Love Mahakal Miss U Motivational Rain Sad Selfish Single Sisters Sorry Thanks
 

मैत्री असावी पाण्या सारखी, निर्मळ, नितळ, स्वछ जशी, मैत्री असावी समुद्रा सारखी, उधाण आलेल्या बेधुंद लाटच जशी, मैत्री असावी घनदाट वृक्षा सारखी, थकलेल्या जीवाला सावली देणारी.

आपली मैत्री एक फुल आहे, ज्याला मी तोडू शकत नाही, आणि सोडू ही शकत नाही, कारण तोडले तर सुकून जाईल आणि सोडले तर कोणी दुसरा घेऊन जाईल.

चांगले मिञ या जगात सहजासहजी मिळत नाहित जवळ असताना माञ एकमेकाशि पटत नाहि.. कळत असत सार काहि पण एक माञ वळत नाहि काय असते हि मैञी? ते मिञांपासुन दुर गेल्याशिवाय कळत नाही..

चांगल्या काळात हात धरणे, म्हणजे मैत्री नव्हे, वाईट काळात देखील हात न सोडणे म्हणजे मैत्री.

आकाशात चंद्रासाठी चांदण्या खूप आहे, पण चांदण्यासाठी चंद्र एकच आहे, तुझ्यासाठी मित्र खूप असतील, पण माझ्यासाठी फक्त तू आहे.

आयुष्यात जास्त सुख मिळाले तर वळून बघ. मी तुझ्या मागे असेन पण दुखामध्ये वळून बघू नकोस कारण तेव्हा मी तुझ्या सोबतच असेन.

१ दिवस प्रेमाने मैत्रीला विचारले, जगात मी असताना तू आलीस कशाला? ठेव्हा मैत्री म्हणाली, “जिथे जिथे तू अश्रू देऊन जाशील ते पुसायला”

निशब्द भावनेला स्पर्शाची साथ, हळव्या मनाला आसवांची साथ, उधाण आनंदाला हास्याची साथ, तशीच असु दे माझ्या जीवनाला तुझ्या मैत्रीची साथ.

मैत्रीसाठी पुढे केलेला हात कोणी मागे घेत नसतं पण जीवनभर विश्वासने साथ देणारा हात आपणच आपलं शोधायचा असतो सावलीसाठी कोणी स्वताहून आसरा देत नसतं रणरणत्या उन्हात सावलीसाठी एक झाड आपणच आपलं शोधायचं असतं.

दोन गोष्टी सोडुन मैञी करा, एक खोटेपणा आणि दोन मोठेपणा.

आपल्यासाठी तोच मिञ खास असतो. ज्याबद्दल घरचे म्हणतात- याच्या सोबत परत दिसला तर तंगड तोडीन.

चांगल्या व्यक्तिसोबत मैञी ही ‘ऊसा’ सारखी असते, तुम्ही त्याला तोडा, घासा, पिरगळा,ठोका किंवा ठेचुन बारिक बारिक करा तरी अखेरपर्यत त्यामधुन गोडवाच बाहेर येईल.